तालुक्यातील शेमल्या गावातील सुपुत्र आणि भारतीय लष्करातील जवान दिनेश तुफान पावरा वय ३० यांचा देशसेवेत कर्तव्य बजावत असताना लदाख येथे 7 सप्टेंबर रोजी दुपारी वीरमरण आल्याची अतिशय दुःखद घटना घडली आहे.त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दिनेश पावरा याने देशसेवा हीच मोठी सेवा मानत दोन वर्षांपूर्वीच भारतीय लष्करात अग्निवीर म्हणून सामील झाला होता.दिनेश पावरा हा लडाख मध्ये भारतीय सैन्यदलाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये कार्यरत होता.