वर्षभर ज्या क्षणाची कोकणी माणूस आतुरतेने वाट पाहतो तो गणेशोत्सव आज पासून मोठ्या उत्साह सुरू झाला आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र उत्सवाचे वातावरण असून घरोघरी गणेशांची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषात गणरायाचे स्वागत करण्यात आले.