वाकड येथील आय टी इंजिनिअरला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ६९ लाखांना गंडा घालणाऱ्या सायबर टोळीतील ओडिशातील शिक्षकाला पिंपरी चिंचवडच्या सायबर पोलिसांनी गेल्या महिन्यात पकडले होते. याचप्रकरणात आता मुंबईतील टॅक्स कंन्सल्टंट याला अटक केली आहे.