छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंग मंदिरात शिवसेना पक्षाची भव्य जाहीर सभा आणि पक्ष मेळावा जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमात आमदार संजना जाधव यांच्या धडाकेबाज भाषणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थक्क होऊन ऐकत राहिले. कार्यक्रमातील त्यांचा व्हिडिओ आज दि ९ स्पटेंबर रोजी सांयकाळी पाच वाजेपासून सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावेळी शिंदे यांनी जाधव यांना भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले.