अहेरी जिल्हा निर्मिती कृती समिती अहेरीतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आज एक महत्त्वपूर्ण निवेदन देण्यात आले. या निवेदनात "स्वतंत्र अहेरी जिल्हा" घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे करण्यात आली आहे.सदर निवेदनामध्ये घोट, अहेरी, आसरअली. कमलापूर, झिमलगट्टा, पेरिमिली या नव्या तालुक्यांसह स्वतंत्र अहेरी जिल्हा करण्याची मागणी नोंदविण्यात आली.