भांडे वितरणासाठी पुसद तालुक्यातील सेलू बुद्रुक येथे आज दि. १ सप्टेंबर रोजी इमारत बांधकाम कामगारांची मोठी गर्दी उसळली. शासनाच्या योजनेअंतर्गत भांडे मिळावे म्हणून अनेक कामगारांनी ऑनलाइन नोंदणी करत १ सप्टेंबर ही तारीख निवडली होती. मात्र आज सकाळपासून हजारो कामगार यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून सेलू बुद्रुक केंद्रावर दाखल झाले असता, तेथे एकही अधिकारी किंवा जबाबदार हजर नसल्याने कामगारांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. यामुळे केंद्रावर कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.