खानापूर ते आटपाडी मार्गावर आज दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात पिकप टेंपो पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटरसायकलस्वार रमेश बाबुराव साळुंखे हे गंभीर जखमी झाले. या धडकेत त्यांच्या पायास मोठी दुखापत झाली असून घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात अज्ञात पिकप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असू