वनपरिक्षेत्र रामटेक अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत बोरडा सराखा अंतर्गत येणाऱ्या बोरडा जंगल परिसरात मंगळवार दिनांक 9 सप्टेंबरला दु. तीन वाजताच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने एका गाईवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने मागील एका महिन्यापासून वाघाचे थांबलेले हल्ले पुन्हा सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील शेतकरी चंद्रभान ताराचंद धोटे यांच्या मालकीची ही गाय होती. घटनेची माहिती वनविभाग रामटेकला देण्यात आली. पंचनामा करण्यात आला.