मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर येथे एक दुर्दैवी घटना घडली असून, एका मराठा आंदोलकाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.