राहुरी पोलीस ठाणे अंतर्गत अजामीनपात्र वॉरंट मधील सात आरोपींना राहुरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आज मंगळवारी दिवसभरात राहुरी पोलीस पथकाकडून हि विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या या आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. अनेक दिवसापासून त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट असल्याने पोलिसांकडून हि कारवाई करण्यात आली आहे.