मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर मध्य मुंबई जिल्हा कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस मंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार योगेश सागर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनिषा चौधरी, आमदार पराग अळवणी, आमदार अतुल भातखळकर, आमदार संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे, माजी जिल्हाध्यक्ष सुषम सावंत आणि इतर सदस्य उपस्थित होते.