सांगोला वनविभागाच्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांना वनविभागाने तातडीने आर्थिक मदत करावी व चालू वैद्यकीय उपचार करावा अशी मागणी बहुजन समाज क्रांतीचे नेते बापूसाहेब ठोकळे यांनी केली होती. याबाबतचे निवेदन सहाय्यक वनसंरक्षक ऐश्वर्या शिंदे व वनपरिक्षेत्र अधिकारी सागर मगर यांना दिले होते. याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून मदत करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती ठोकळे यांनी 25 रोजी दुपारी १ च्या सुमारास दिली. त्यांनी सांगोला वनविभाग याठिकाणी संवाद साधला आहे.