गट ग्रा.पं. बेलदा स्वच्छ भारत मिशन शासनाच्या टप्पा दोन मध्ये पदार्पण करीत असताना ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या सर्व गावात दारूबंदी करण्यास देवलापार पोलिसांनी पुढाकार घ्यावा या मागणीचे निवेदन मंगळवार दि. 23 सप्टेंबरला दु. एक वाजताच्या दरम्यान देवलापारचे ठाणेदार नारायण तुरकुंडे यांना देवलापार पोलीस स्टेशन येथे देण्यात आले. निर्मल गट ग्रामपंचायत बेलदाचे निवेदन, महिलांचे निवेदन, ग्रा.पं. रक्षक दलाचे मागणी पत्र तसेच तंटामुक्ती समितीचे निवेदनाचे संदर्भ यावेळी ठाणेदार तुरकुंडे यांना देण्यात आले.