कारंजा तालुक्यातील शेलुवाडा येथे दि. 29 ऑगस्ट रोजी एका 54 वर्षीय व्यक्तीस विषबाधा झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधीत व्यक्तीचा विषारी औषधाशी संपर्क आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. कैलास वासुदेव पांगले असे विषबाधा झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. शेतकर्यांनी रासायनीक औषधांचा वापर करताना आवश्यक ती सावधानता व सुरक्षात्मक साधनांचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.