गडचिरोली जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न नेहमीच वासुन उभा असतो. शिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयातील 108 रुग्णवाहिका भंगार अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे. सदर रुग्णवाहिका नाद दुरुस्त असल्यामुळे त्यांना धक्का मारूनच सुरू करावे लागत असल्याचा व्हिडिओ समोर येत असून अशा रुग्णवाहीकांमध्ये डॉक्टरांची सुद्धा उपस्थिती राहत नाही असा सुद्धा आरोप ग्रामस्थांकडून लावण्यात आला आहे.