मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबई या ठिकाणी आंदोलन करणारा असून आज ते मंचर या ठिकाणी आले असता त्यांचे आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना क्रेनच्या सहाय्याने भव्यदिव्य पुष्पहार घालण्यात आला तसेच जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली.