मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड येथे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. फिर्यादी तुकाराम सुखदेव शिखरे (वय ५१, व्यवसाय ड्रायव्हर, रा. अर्जुनसोंड) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारास १२.३० ते २.०० वाजण्याच्या दरम्यान घटना घडली. तुकाराम शिखरे हे ट्रक घेऊन गावात आल्यानंतर घरी जात असताना, जुन्या घराचे दरवाजे उघडे दिसले. चौकशीअंती पत्नी सुनिताबाई यांच्यासह पाहणी केली असता घराचे कुलूप तोडलेले आढळले.