राज्यसभा खासदार मा. धनंजय महाडिक यांच्या निधीतून व युवक नेते मा. देवराज बारदेसकर यांच्या प्रयत्नातून आकुर्डे ता. भुदरगड येथे सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता करिता 10 लाख रु मंजूर झाले होते. सदर कामाचा शुभारंभ शेणगाव च्या लोकनियुक्त सरपंच सविता देवराज बारदेसकर यांच्या हस्ते संपन्न झाला.उदघाटन प्रसंगी सरपंच सविता बारदेसकर म्हणाल्या खा. महाडिकयांच्या वतीने व युवक नेते देवराज बरदेसकर यांच्या प्रयत्नाने भुदरगड तालुक्यामध्ये सुमारे 8 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करून आणली आहेत.