सहा सप्टेंबरला रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूर महानगरपालिका आणि सद्भावना सांस्कृतिक क्रीडा मंडळ द्वारे कच्छी विसा मैदान येथे भव्य गणेश विसर्जन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान येथे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून कचरा टाकण्यासाठी कचराकुंड देखील ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी देखील दहा वर्ष बाप्पाची मनोभावे पूजा करून आज अक्षरशः अश्रू पूर्ण डोळ्यांनी बाप्पांना निरोप देत पुढच्या वर्षी लवकर आगमन करण्याची प्रार्थना केली आहे. या मैदानात भव्य डीजे लावण्यात आले.