चिपळूण पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल रमेश रतन चव्हाण यांना लखनऊ येथे अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात पोलीस पोट्रेट स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. या स्पर्धेत देशातील २९ राज्यातील पोलिसांनी सहभाग घेतला होता. सुवर्णपदक मिळाल्याबद्दल मंगळवारी सायंकाळी चार वाजता चिपळूणमधील चव्हाण यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.