बेकायदेशीरित्या प्राण्यांचे मांस कापून त्याची विक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. याठिकाणाहून गुरांचे मांस याच्यासह ते कापण्याचे साहित्य तराजू आणि रोकड असा एकूण १५ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता उमर कॉलनीत केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.