Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 22, 2025
वडगाव कोल्हाटी परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने राहत्या घरातील जिन्याच्या सळईला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. २० रोजी पहाटे पाचच्या सुमारास घडली. संदीप अरुण देवरे (मूळ रा. सनफळ, ता. चोपडा, जि. जळगाव, ह. मु. गट नं. ६ वडगाव कोल्हाटी), असे मयताचे नाव आहे.