जालना येथीली पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या प्रशिक्षण कक्षात सोमवार दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 वाजता नशाबंदीवर आधारीत प्रश्नमंजुषा कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण सोहळा घेण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षक यांच्या उपस्थितीत हा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. व्यसनमुक्ती वर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी शाळा आणि महाविद्यालयात ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात प्रत्येकी 3 क्रमांक काढण्यात आले.