तालुकास्तरीय जनाधिकार समित्या स्थापन करण्याच्या मागणीसाठी मनसे जनाधिकार सेनेने मंगळवारी दुपारी गारगोटी येथे तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. या समित्या अत्यंत महत्वाच्या असून यांच्यामुळे तालुकास्तरीय बरेच प्रश्न सोडविण्यात मदत होते, असे मनसे जनाधिकार सेनेने सांगितले. याप्रसंगी मनसे जनाधिकार सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज येडूरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.