आज सोमवारी दुपारी २ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथील कार्यालयात 'जनता संवाद'चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी सर्वांनी आपापले प्रश्न, समस्या व प्रलंबित मागण्या मांडल्या. यासंदर्भातील विषयांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचा विश्वास व्यक्त केला.