सततच्या पावसामुळे तसेच कोयना धरणातून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. नदीचे पाणी पात्रा बाहेर आल्यामुळे नदी काठची शेती आणि घरे पाण्यात गेली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत कृष्णा घाट परिसराची माजी मंत्री आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी पाहणी केली. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरू नये, संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन प्रशासन सज्ज आहे, असे मत माजी पालकमंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केले.