प्रादेशिक हवामाना विभाग मुंबईकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात शनिवारी काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतरत्र हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून भात पिकातून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याचे व्यवस्थापन करावे, जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र मार्फत करण्यात आले आहे.