रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील मांडवकरवाडी येथे सोमवारी सकाळी एका खवले मांजराची नायलॉनच्या जाळीतून यशस्वीपणे सुटका करण्यात आली. निसर्गप्रेमी श्री. रोहन वारेकर यांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या तात्काळ प्रतिसादामुळे या वन्यप्राण्याचा जीव वाचला. समीर सुभाष भातडे यांच्या आंबा कलम बागेतील कुंपणाला लावलेल्या नायलॉनच्या जाळीत एक खवले मांजर अडकल्याची माहिती श्री. रोहन वारेकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ वनविभागाला याची सूचना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले