उदगीर तालुक्यातील कौळखेड येथील बंजारा समाजाचे नेते बापूराव राठोड यांची ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपूर्ण बंजारा बांधवांच्या भेटीगाठी साठी दौरे सुरु केले आहेत प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांनी समाज बांधवांशी संवाद साधताना बंजारा समाजाना अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे ही महाराष्ट्रातील बंजारा समाजाची जुनी मागणी आहे ही मागणी लक्षात घेवून भविष्यात आरक्षणासाठी लढा उभा करू असे मत प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांनी व्यक्त केले.