भामरागड - शहरातील संघर्ष नगर येथे काही इसम अवैधपणे गोवंशाची कत्तल करीत मांस विक्री करतात या गोपनीय माहीती वरून काल रविवार रोजी सांयकाळी पोलीस स्टेशन भामरागडचा चमूने पशू वैद्यकीय अधिकार्यासह येथे धाड टाकत या अवैध व्यवसायात गूंतलेले दोन आरोपीना अटक करीत त्यांचाकडून ३६.७५ कीलो गोवंश मांस एकूण किमत १८ हजार रुपए जप्त केला अशी माहिती आज दि.२९ सप्टेबंर रविवार रोजी दूपारी १२ वाजता भामरागड पोलीसांचा वतीने देण्यात आली आहे.