शहरातील मोक्षधाम परिसरातील पद्मतीर्थ या तलावामध्ये दिनांक 23 ऑगस्ट रोजी मृतदेह तरंगताना आढळल्याने उपस्थितांनी सदर बाबत वाशिम शहर पोलीस स्टेशनला कळवली. शहर पोलिसांनी पद्मतीर्थ तलावाकडे धाव घेतली. सदर मृतदेह तलावाच्या बाहेर काढल्यानंतर सदर व्यक्तीची ओळख पटली असून हिंगोली नाका परिसरात राहणारे राधेसिंह ठाकूर असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. सदर मृतदेहा जवळ सुसाइड नोट मिळाली असून बिमारीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यामध्ये लिहिलेले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रानी सांगितले.