यवतमाळ शहरात यंदा प्रथमच प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक संकलन करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. पारंपरिक विसर्जन पद्धतीत PoP मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने त्या नदी, नाले, तलाव व विहिरींमध्ये भग्नावस्थेत पडून पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होतात आणि धार्मिक भावनांनाही धक्का बसतो. या पार्श्वभूमीवर नगर परिषद, यवतमाळ तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या आवाहनाला गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.