भारत पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामन्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले, यावर आज शनिवार दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, भारताने बहुपक्षीय स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, तो निर्णयही घेण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय स्पर्धा होणार नाही.