गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी बकऱ्या चोरणाऱ्या 5 आरोपीस गादा शिवारात ताब्यात घेऊन मौदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना घडली.याबाबत चे वृत्त असे की आरोपीनी बकऱ्या चोरुन कामठी शहराच्या दिशेने पळ काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून 5 आरोपीस गादा शिवारात ताब्यात घेऊन मौदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.5 आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मौदा पोलीस करीत आहेत.