सोलापूर शहरातील एका वस्तीत चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला इशारे करून बोलावत तिला मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य केल्याप्रकरणी एका तरुणावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. पीडिता राहत असलेल्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. सदर ठिकाणी आरोपी हा काम करतो. शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आरोपीने पीडितेला इशारे करून जवळ बोलावले. त्यानंतर तिला लज्जा वाटेल, असे कृत्य केले.