काठापूर खुर्द(ता.शिरूर) परिसरातील घोडनदीच्या काठावरून बुधवारी (ता.27) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी सात शेतकऱ्यांच्या तब्बल 64 हजार रुपये किंमतीच्या विजेच्या केबलची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रामदास रघुनाथ दाते (वय 34,रा. काठापूर खुर्द, ता.शिरूर,जि.पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.