होळ, तालुका फलटण जिल्हा सातारा येथील लक्ष्मी नंदू भोसले यांचा मुलगा, शेखर नंदू भोसले याला वडगाव येथील कॅनल मध्ये हातपाय बांधून मारून टाकण्यात आले असल्याचा संशय, भोसले कुटुंबीयांनी केला असून, या संदर्भात आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी पारधी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ही घटना दिनांक आठ ऑगस्ट रोजी घडली आहे,तरी देखील आज अखेर मारेकऱ्यांचा शोध लागला नसल्याचा आरोप केला आहे.