सावळी सदोबा ते अकोला बाजार मार्गावरील घाटामध्ये मालवाहू ॲपे पलटी होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना चार सप्टेंबरला उघडकीस आली. सुरेखा फुलमाई, निलेश जाधव, पृथ्वीराज भवरे, प्रकाश फुलमाळी,अमोल जगताप, मंदा गभाने अशी अपघातातील जखमींची नावे आहे. सर्व जखमींवर सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.