पालघर जिल्ह्यातील धोकादायक रासायनिक उत्पादन करणारे कारखान्यांमधील प्रदूषण नियंत्रण, कामगार सुरक्षा आपात्कालीन उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या अध्यक्षतेत विशेष बैठक संपन्न झाली. बैठकीस आमदार राजेंद्र गावित, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उद्योग व्यवसायिक, तहसीलदार, कारखान्यांचे भोगवटादार, व्यवस्थापक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक, कामगार उपायुक्त, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.