राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुद्दत उपोषण सुरू केले आहे.आज, मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.