ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ओबीसी समाजातील सर्व घटकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक उद्या, दिनांक ३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पंढरपूर येथील परताळे दिंडी मठ येथे होणार आहे. या बैठकीत समाजातील सर्व बहुजन बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी आज मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता केले आहे.