आर्णी तालुक्यातील नाईकनगर गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत देण्याची मागणी अक्षय राठोड यांनी केली असून, या मागणीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू झाला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार नाईकनगरची लोकसंख्या १७६१ असून, स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेसाठी आवश्यक असलेली १००० लोकसंख्येची अट पूर्ण होत आहे. मात्र यरमल हेटी ग्रामपंचायतीपासून हे गाव सुमारे १.५ कि.मी. अंतरावर असल्यामुळे ग्रामस्थांना शासकीय कामकाज व विविध योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येतात. या संदर्भात यरमल हेटी ग्रामपंचायतीने दि. ११/०७/२