रामटेक येथील गंगाभवनम सभागृहात शनिवार दि. 27 सप्टेंबर ला सकाळी 11वा पासून 'सर्वांसाठी घरे 'उपक्रमांतर्गत पट्टे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यमंत्री एड. आशीष जयस्वाल यांचे हस्ते रामटेक उपविभागातील 591 लाभ्यार्थ्यांना पट्टे वितरित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विपीन इटनकर, एसडिओ प्रियेश महाजन, तहसीलदार रमेश कोळपे उपस्थित होते. यावेळी बोलतांना राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी पाणंद रस्ते हा जिव्हाळ्याचा विषय असून त्याचे दुरुस्तीला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.