दि.3 ऑगस्ट रोजी खजरी शेती शिवारात एक अनोळखी महिला हिला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने धारदार शस्त्राने वार करून जिवाणसी ठार केल्याने डोग्गीपार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया या घटनेचा तपास करीत असताना 21 ऑगस्ट रोजी पोलीस पथके मृतक अनोळखी महिलेचा व आरोपीचा शोध घेत असता अनोळखी महिला ही भिलाई छत्तीसगड येथील रहिवासी असल्याची माहित पडले. यातील आरोपी व त्यांचे साथीदारांना जेरबंद करण्यात आले आहे.