गत पन्नास वर्षात शेतकऱ्यांचे पावसामुळे जेवढे नुकसान झाले नसेल तेवढे नुकसान राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत झालेल्या पावसाने झाले आहे. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भाग उध्वस्त झाले आहेत. राज्याच्या प्रत्येक भागात शासन शेताच्या बांधावर जावून पंचनामे करीत आहे. नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर तालुक्यातील असलेल्या डाढेरा,तेलगाव, नांदा गोमुख व जिल्ह्यातील इतर गावातील कृषी क्षेत्राची त्यांनी पाहणी केली.