शिर्डीतील साई संघम सेवाभावी संस्था शिरडी आणि आर झुंझुनवाला शंकर हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल साई संघम येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. यावेळी पंचक्रोशीतील तरुणांनी रुग्णांनी या शिबिरास उपस्थित राहून आपली नेत्र तपासणी करून घेतली. सामाजिक दायित्व म्हणून राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे यांनी सुरू केलेल्या मोफत रुग्ण सेवेचा अनेकांना लाभ मिळत असल्याने रुग्ण समाधान व्यक्त करीत आहेत.