उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना लोकप्रतिनिधी म्हणून कामगारांकडून तक्रारी येतात, ज्यात अधिकारी किंवा पोलिसांकडून गैरव्यवहार झाल्याचे म्हटले जाते. मात्र, अनेकदा संपूर्ण परिस्थितीची माहिती नसते.