जालना जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव जाणार मुंबईकडे, मराठा आंदोलन जगन्नाथ चव्हाण यांचे कार्यालयातून केले शांततेचे आवाहन.. मराठा आरक्षण आंदोलनाचा निर्णायक टप्पा गाठत असताना, राज्यभरातील मराठा समाज 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडक देणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करीत असून, जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी बैठका घेऊन मोठ्या प्रमाणात समाजबांधवांना एकत्र केले जात आहे. अंतरवाली सराटी येथील बैठकीनंतर जालना शहरातील मातोश्री लॉन्स येथे महत्वाची बैठक संपन्न झाली. त्यानंतर शहरा