भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे भीमा नदी पाणी पातळी वाढली असून प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान भीमा नदी पात्रात पाणी पातळी वाढल्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुका प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने नागरिकांना आज गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी चार वाजता सतर्कतेचा इशारा दिला आहे.