नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मनसर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक गाय गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार दि. 11 सप्टेंबरला रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या तत्परतेने या जखमी गाईचा जीव वाचवता आला. या घटनेची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमी गाई वर उपचार केले.